मोहिदा पीक संरक्षण सोसायटी चेअरमनपदी राजाराम पाटील

0

शहादा । तालुक्यातील मोहिदा येथील पीक संरक्षण सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणूकीत चेअरमनपदी राजाराम रघुनाथ पाटील तर व्हा चेअरमनपदी भरत रामदास पाटील यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. सोसायटीच्या 13 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम सहाय्यक निबंधक कार्यालय शहादा यांनी जाहीर केला होता. सर्व जागांसाठी बिनविरोध निवड करण्यासाठी ग्रामस्थ प्रयत्नशील होते व अखेर निवडणूक बिनविरोध पार पडली.

13 जागांसाठी झाली निवडणूक
पीक संरक्षण सोसायटीतर्फे निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. ग्रामस्थांनी निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्वोपरी प्रयत्न करुन गावात एकोपा राहावे म्हणून 13 जागांसाठी 13 च नामनिर्देश पत्र दाखल केले होते. मंगळवारी 19 रोजी सकाळी 11 वाजता सहाय्यक निबंधक एम. बी. पावरा यांच्या अध्यक्षतेखाली चेअरमन व व्हा चेअरमन पदासाठी निवडणूक कार्यक्रम पार पडला.

यांची होती उपस्थिती
यावेळी नवनिर्वाचित सदस्य राजाराम रघुनाथ पाटील, भरत रामदास पाटील, ईश्‍वर मुरार पाटील, प्रकाश नरोत्तम पाटील, तुकाराम पुरूषोत्तम पाटील, स रेखाबाई हिरालाल पाटील, गंभा विमलबाई रतिलाल पाटील, संजय अशोक पाटील, प्रकाश तुकाराम पाटील, राजेंद्र लक्षण पाटील, देवेंद्र भगवान पाटील, कल्याण लक्षण पाटील, कलास देवासमोर पाटील आदी उपस्थित होते.

ग्रामस्थांकडून अभिनंदन
या 13 नवनिर्वाचित सदस्यांपैकी चेअरमन पदासाठी राजाराम रघुनाथ पाटील तर व्हा चेअरमन पदाकरिता भरत रामदास पाटील यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. या नवनिर्वाचित चेअरमन, व्हा चेअरमन व सदस्यांचे पंचायत समिती सदस्य ओंकार पाटील , सरपंच गिरधर पाटील, सातपुडा साखर कारखान्याचे संचालक जयप्रकाश रामदास पाटील, उपसरपंच पुरूषोत्तम पाटील ,हिरालाल दतु पाटिल खरेदी विक्री सघाचे संचालक मधूकर पाटील आदीसह ग्रामस्थांकडुन अभिनंदन करण्यात येत आहे या निवडणुकीत पीक सोसायटी चे सचिव संजय पाटील यानी परिश्रम घेतले.