मोहीम चांगली परंतु गैरफायदा घेतला जाऊ नये – रजनीकांत

0

मुंबई : #MeTooचा वारा जोराने पसरत आहे. भारतातील महिलावर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात #MeToo च्या माध्यमातून बोलू लागल्या आहेत. यावर आता सुपरस्टार रजनीकांत यांनी आपले मत दिले आहे. या मुव्हमेंटला त्याने पाठींबादेखील दर्शवला असून गैरवापर होणार नाही याची काळजी घ्यावी असेही सांगितले.

#MeToo ही चांगली चळवळ आहे असे रजनीकांतचे म्हणणे आहे. परंतु याचा गैरफायदा घेतला जाऊ नये असे सांगायलाही रजनीकांत कमी पडले नाहीत. चित्रपटाचे शूटींग संपवून वाराणसीहून चेन्नईला परतत असताना हा प्रश्न रजनीकांतला विचारण्यात आला होता. मीटू चळवळीचा योग्य वापर झाला पाहिजे असे त्यांनी आवर्जुन सांगितले.