भुसावळ प्रतिनिधी दि 16
महाराष्ट्र शासनाच्या वतीने एक सप्टेंबर 2023 ते 15 सप्टेंबर 2023 या दरम्यान स्वच्छता पंधरवाडा मोहीम राबवण्यात आली. त्या अनुषंगाने भुसावळ नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व या विषयावरती माहिती देण्यात आली. आपला परिसर स्वच्छ असेल तर आरोग्य चांगले राहते. विद्यार्थ्यांनी आपले घर व घरा जवळचा परिसर स्वच्छ ठेवावा त्यामुळे आपले सर्वचे आरोग्य चांगले राहते. असे सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक ललित फिरके यांनी संबोधित केले. तसेच सर्व विद्यार्थी शिक्षकांनी शाळेची स्वच्छता केली. शाळेच्या परिसरात स्वच्छते विषयीचे जनजागृती केली. कार्यक्रम यशस्वी साठी डी के भंगाळे, निलेश बोराडे, सर्व विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेऊन यशस्वी केला.