म्हसळा ग्रामीण रुग्णालय अधीक्षकपदी मेहता

0

म्हसळा । उद्घाटनानंतर गेली दोन वर्षे प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून सुरू असलेले म्हसळा येथील रुग्णालय आता ग्रामीण रुग्णालय म्हणून म्हणून सुरू होत आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षकपदी डॉ. महेश मेहता यांची नियुक्ती करण्यात आली असून, एक एक्सरे टेक्निशियन, एक फार्मासिस्ट, एक लॅब टेक्निशियन, एक जुनिअर क्लार्क आणि सात नर्सेस, अशी पदे तातडीने भरण्यात आली आहेत. मात्र, अजूनही 3 वैद्यकीय अधिकारी, 7 नर्सेस आणि इतर आवश्यक साहित्याची त्वरित पूर्तता करावी यासाठी महादेव पाटील यांनी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याकडे निवेदन देऊन प्रत्यक्ष पाठपुरावा करणार आहे.

जनतेची प्रामाणिकपणे सेवा करण्याचे आवाहन
नियुक्त केलेल्या स्टाफचे आणि नवनियुक्त अधीक्षक डॉ. महेश मेहता यांचे यावेळी स्वागत करून तालुक्यांतील गोरगरीब जनतेची प्रामाणिकपणे सेवा करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. याप्रसंगी माजी सभापती महादेव पाटिल, डॉ. पवन यादव, डॉ. गजानन भारती, सरपंच भालचंद्र नाक्ती, काशीनाथ खोत, संजय खांबेटे, मनोज नाक्ती, महेश पवार, अंकुश गानेकर, निकेश कोकचा आदी मान्यवर उपस्थित होते.