म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांना जीवे मारण्याची धमकी

0

मुंबई –म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांना जीवे मारण्याच्या धमकी देण्यात आली आहे. अज्ञातांकडून आपल्याला धमक्यांचे फोन येत असल्याचे सामंत यांनी सांगितले. तसेच आपल्या जीवाला धोका असल्याच्या तक्रारीचे एक पत्र त्यांनी पोलिस आयुक्तांना पाठवले आहे.

अनधिकृत विकासकामांच्या विरोधात भुमिका घेतल्याने आपल्याला या धमक्या येत असून त्यामुळे आपल्या जीवाला धोका असल्याचे त्यांनी पोलिसांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. जिवाचं बरं वाईट झाल्यास त्यास प्रशासन जबाबदार असणार आहे. विकासक आणि समाजकंटक नाराज होत आहेत. काही अज्ञातांकडून धमक्या येत असल्याचे सामंत यांनी सांगितले आहे. तसेच सरकारने लवकरात लवकर पाऊल उचलावे. याबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती दिल्याचे ही त्यांनी सांगितले आहे.