‘म्हातारपण तुझे आले, माझे नाही’- काजोल

0

मुंबई : करण जोहरचा चॅट शो ‘कॉफी विथ करण’ अल्पावधीतच लोकप्रिय झाला आहे. या शोमध्ये बॉलीवूडचे अनेक सेलिब्रिटीज येत असतात. त्यांच्या आयुष्यातील कधीही न ऐकलेल्या अनेक किस्से इथे उघड होत असतात. नुकतेच अर्जुन कपूर आणि बहीण जान्हवी कपूरने या शोमध्ये एकत्र हजेरी लावली होती. आणि हा एपिसोड प्रेकक्षांना खूप आवडला. आता मात्र पुढच्या एपिसोडमध्ये बॉलीवूडची मस्तीखोर जोडी अजय देवगन आणि पत्नी काजोल येणार आहेत.

शो दरम्यान, करणच्या प्रश्नावर अजयने पत्नी काजोलविषयी अशी काही प्रतिक्रिया दिली की हे ऐकून काजोल चांगलीच भडकली. अजय म्हणाला, मला काजोलचे फोटो काढण्यात काहीच अडचण नाहीये. मात्र, अडचण ही आहे की फोटो काढल्यानंतर ३ तास काजोल त्याला एडिट करत बसते. म्हातारपणी असे कोण करत. हे ऐकून काजोल म्हणाली, ‘म्हातारपण तुझे, आले माझे नाही’.

यानंतर करणने अजयला लग्नाची तारिख विचारली. तर अजय कन्फ्यूज होऊन म्हणाला २३ फेब्रुवारी. हे ऐकून काजोलला धक्का बसला आणि चिडून म्हणाली २४ फेब्रुवारी, १९९९. या दोघांची नोक झोक पाहून हा एपिसोड अतिशय मजेशीर असणार आहे हे दिसून येत आहे.