म.फुलेंच्या स्मृतीदिनी प्रस्तावाचे आवाहन

0

अमळनेर : ओबीसी विद्यार्थी शिक्षक पालक विकास असोसिएशनच्या वतीने 28 नोव्हेंबर या महात्मा फुलेंच्या स्मृतीदिनी शिक्षकाचा गुणगौरव दरवर्षी केला जातो. ओबीसी शिक्षक असोसिएशन गेल्या 10 वर्षापासून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष विलासराव पाटील करीत आहेत. यावर्षीही उत्तर महाराष्ट्रातून उपक्रमशिल शिक्षकांचा गुणगौरव केला जाणार आहे. तरी शिक्षक बांधवांनी आपले प्रस्ताव पाठवावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. सपुर्ण भारतातील स्त्रियांना व बहुजनांना शिक्षणाची दारे खुली करणार्‍या महात्मा फुले यांचा स्मृती दिवस शिक्षक दिवस म्हणून साजरा करत असतो व त्याबाबत असोसिएशन च्या वतीने आवाहन शिक्षकांना व शाळांना करण्यात येते व त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या निमित्ताने उत्तर महाराष्ट्र स्तरावर उपक्रमशिल प्रथामिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व महाविद्यालयातील प्राध्यापक व मुख्याध्यापक व प्राचार्य यांना गुरुगौरव पुरस्कार 2017 देऊन मान्यवरांच्याहस्ते गौरविले जाणार आहे यासाठी शिक्षकांनी शिक्षण क्षेत्रात नाविण्यपूर्ण उपक्रम राबविले पाहीजेत.

शैक्षणिक साहित्य निर्मिती, शैक्षणिक लेख प्रसिद्ध असावेत कविता संग्रह, कथासंग्रह प्रकाशित असेल वैज्ञानिक उपकरणे व विज्ञान प्रर्दशनात सहभाग तसेच शाळा डिजिटल करण्यात विशेष योगदान असेल त्याचा प्रस्ताव तयार करून पाठवावा. प्रस्तावाबरोबर आपला बायोडाटा, प्राचार्य व मुख्याध्यापकाचे शिफारस पत्र जोडून 20 नोव्हेंबर 2017 पर्यंत ओबीसी असोसिएशनचे अध्यक्ष विलासराव पाटील 65अ, गारवा सदगुरू काँलनी, दत्त मंदिर परीसर धुळे या पत्यावर पाठविण्याचे आवाहन ओबीसी असोसिएशनचे विश्वस्त ईश्वर महाजन, वसुंधरा लांडगे, सतिश वैष्णव, संजय खलाणे, काशिनाथ माळी, अनिल सोनवणे, प्राचार्य जितेंद्र पगारे, प्रविण पाटील, व्ही.आर.महाजन, वासुदेव माळी, रूपेश कुलकर्णी यांनी केले आहे.