चिंचवड- येथील महात्मा बसवेश्वर चौकामध्ये अपघातांची संख्या वाढली आहे. त्यामुळे या चौकात पादचारी पूल, रस्ता दुभाजक उभारावा, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका मीनल यादव यांनी महापालिकेकडे केली आहे. याबाबत बीआरटी विभागाचे उपअभियंता विजय भोजने यांना नगरसे विका मीनल यादव यांनी निवेदन दिले.
विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका
या निवेदनात नगरसेविका यादव यांनी म्हटले आहे की, मोहननगर प्रभाग क्रमांक चौदामधील चिंचवड स्टेशन ते केएसबी चौक रस्ता बीआरटीकडे आहे. त्यात महात्मा बसवेश्वर चौक आहे. या चौकांमधून मोहननगरकडून मोरवाडीकडे जाणार्या रस्त्यावर तीन शाळा आहेत. या शाळेचे सर्व विद्यार्थी मोहननगर परिसरातील आहेत. शाळा सुटण्याच्या आणि भरण्याच्यावेळी या चौकामध्ये वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते. के एसबी चौकाकडून येणारी वाहने एमआयडीसीतून येतात आणि ती अवजड असतात. त्यामुळे या चौकात अपघात होतात. यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. प्रभाग क्रमांक चौदामधील विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या ठिकाणी पादचारी पूल उभारणे गरजेचे आहे. चिंचवड स्टेशन चौकापासून ते मोरवाडी महात्मा बसवेश्वर चौकापर्यंत बीआरटीच्या रस्त्यावर बेशिस्त वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. ही वाहतूक सुरळीत होण्यासाठी या उर्वरीत रस्त्यावर लवक रात लवकर दुभाजक बसविण्यात यावे, अशी मागणी नगरसेविका यादव यांनी निवेदनातून के ली आहे.