यंत्रात हात अडकून ज्येष्ठ कर्मचार्‍याचे चार बोटे तुटली

0

म्हाळुंगे इंगळे :– चाकण एमआयडीसीमध्ये प्रेस मशीनवर काम करताना अचानक बिघाड झाल्याने प्रेस मशीनमध्ये हात अडकल्याने कामगारांची चार बोटे तुटल्याची घटना घडली आहे. चाकण पोलिसांत या प्रकरणी कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यासह, ठेकेदार, सुपरवायझर आणि सुरक्षा अधिकारी अशा चौघांवर सोमवारी (दि. 26) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खराबवाडी (ता. खेड) हद्दीतील डाली ऍन्ड समीर या कंपनीत हा धक्कादायक प्रकार घडला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुश्ताक शेख यांनी दिली.

गजानन सदाशिव जाधव (वय 57, रा. बिरदवडी, ता. खेड) असे या दुर्घटनेत डाव्या हाताची चार बोटे तुटलेल्या ज्येष्ठ कामगाराचे नाव आहे. डाली ऍन्ड समीर कंपनीचे वरिष्ठ अधिकारी दास, कंत्राटदार अशोक गोरे, सुपरवायझर जाधव आणि सुरक्षा अधिकारी (चौघांचीही संपूर्ण नावे निष्पन्न नाहीत) यांच्या विरोधात चाकण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून