यंदाही मुंबई होणार जलमय

0

मुंबई । मुंबईतील रस्त्यांंची कामे पालिकेने जोमाने सुरू केली असली तरी पालिकेने दिलेल्या 31 मे पर्यंत कामे पूर्ण करू शकत नाही. अजून सहा ते सात दिवस देडलाईनला बाकी आहेत. इतक्या कमी कालावधीत पालिका कोणत्याही परिस्थितीत रस्त्यांची कामे पूर्ण करू शकत नाही. पालिकेने कितीही दावा केला तरी कामे पूर्ण होवूच शकत नाही, असेे पालिकेच्या आकडेवारीवरबन स्पष्ट होत आहे. पालिकेचा दावा हा फोल ठरणार आहे, त्यामुळे जागो जागी खोदलेल्या रस्त्यांच्या कामाच्या ठिकाणी पावसाचे पाणी साचून मुंबई जलमय होण्याची मोठी शक्यता वर्तवली जात आहे. पालिकेने आतापर्यंत फक्त 155 रस्त्यांची कामे पूर्ण केली आहेत. 585 पैकी 319 रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत.

रस्त्यांच्या कामाबाबत पालिकेचा दावा फोल ठरणार
रस्ता हा प्रमुख व दृश्य पायाभूत सुविधा आहे. स्थायी तांत्रिक सल्लागार समिती (स्टॅक) च्या रस्त्यांसाठी शिफारसीनुसार रस्त्यांचे बांधकाम, सुधारणा व परिरक्षण यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. वाढत जाणारी वाहतुकीची घनता व बार या संदर्भात असलेल्या प्रमाणांचा दर्जा उंचावण्यास आला आहे. मुंबईतील 583 रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली असून यांतील 15 मेपर्यंत 264 कामे पूर्ण करण्यात आली आहेत. मात्र अजूनही 319 कामे अपूर्ण आहेत. ही कामे पावसापूर्वी येत्या 31 मे पर्यंत पूर्ण करण्याची मुदत आहे. ही सर्व कामे पूर्ण झाली नाही तरी यांतील 155 रस्त्यांची कामे 31 मे पर्यंत पूर्ण करण्यासाठी पालिकेची धावपळ उडाली आहे. वाहतुकीची वर्दऴ असते. रस्त्यांची कामे अपूर्ण राहिल्यास तेथे पाणी तुंबून वाहतुकीस अडचण येईल तसचे नागरिकांना समस्यांना तोंड द्यावे लागेल अशा रस्त्यांची कामे प्राधान्याने पूर्ण केली जाणार आहेत.

थातूर मातूर आणि निकृष्ट मलमपट्टी
काही ठिकाणी वरवरची खडी व डांबर टाकल्याने ते पहिल्या पावसांत उकरण्याची शक्यता आहे. कुर्ला (एल वॉर्डात) 18 रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. यातील निम्म्या रस्त्यांची कामे अद्याप अपूर्ण आहेत. काही रस्ते खोदून ठेवलेले असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते आहे. ही कामे पावसापूर्वी पूर्ण होणार का? असा प्रश्‍न येथील रहिवाशांकडून विचारला जातो आहे. पावसापूर्वी कामे पूर्ण न झाल्यास रस्त्यावर खड्डे पडून पाणी साचण्याची शक्यता असल्याने येथील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातो आहे.

धिम्या गतीने काम
येथील रस्त्यांची कामे अत्यंत धिम्या गतीने सुरू असून ही कामे पूर्ण न झाल्यास येथील नागरिकांच्या उद्रेकाला प्रशासनाला सामोरे जावे लागेल.
दिलीप लांडे, मनसेचे नगरसेवक