यवतमाळ-कळंब रोडवर अपघात; ११ जणांचा मृत्यू

0

यवतमाळ- यवतमाळ-कळंब रोडवर चापर्डाजवळ ट्रक आणि क्रुझर जीपमध्ये जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. यामध्ये ११ जण ठार झाले आहे. सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.

अपघातात ठार झालेले सगळेजण कळंब तालुक्यातील पारडी या गावातले रहिवासी होते. यवतमाळमध्ये कामासाठी गेले होते. तिथून परतत असताना हा भीषण अपघात झाला. क्रुझरमधील प्रवाशी एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यानंतर परतीच्या मार्गावर असताना हा अपघात झाला. अपघातातील जखमींना कळंब येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.