यशच्या वाढदिवशी भेट न झाल्याने चाहत्याने स्वत:ला पेटविले

0

मुंबई : ‘केजीएफ’ (कोलार गोल्ड फिल्ड) या चित्रपटाला प्रेक्षकांची तुफान पसंती मिळाली. हा चित्रपट ‘सिंबा’सोबत ८ जानेवारीला प्रदर्शित झाला होता. ८ तारखेला यशचा वाढदिवसही होता. मात्र, त्याच्या वाढदिवशीच यशच्या चाहत्याने त्याच्या घरासमोर स्वत:ला पेटवून घेतले. यात त्या चाहत्याचा मृत्यू झाला.

रवी नावाचा चाहता यशच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करत होता. यशला भेटण्यासाठी तो वारंवार घरात जाण्याचा प्रयत्न करत असताना सुरक्षारक्षकांनी त्याला अडविले. जेव्हा तो घरात जाण्यास अयशस्वी झाला, तेव्हा रागात त्याने स्वत:च्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतले. या घटनेमुळे यशलादेखील वाईट वाटले. मात्र, अशाप्रकारे हिंसक वृत्ती बाळगणारे माझे चाहते असूच शकत नाही, असे त्याने म्हटले आहे.