जळगाव। सकारात्मकता कायम ठेवावी तसेच धेय यशस्वी करण्यासाठी अभ्यासाला प्राथमिकता देणे महत्वाचे आहे असे मत राष्ट्रीय प्रशिक्षक अल्ताफ अली सय्यद यांनी व्यक्त केले. जी.एच.रायसोनी कनिष्ठ महाविद्यालय व जुनियर चेंबर इंटरनेशनल इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ’गोलसेट’ या विषयवार आयोजित व्याखानात ते बोलत होते. यावेळी प्राचार्य प्रल्हाद खराटे, जेसीआयचे अध्यक्ष प्रा.रफिक शेख, कार्यक्रम संचालक प्रतिक सेठ आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.दीपक पाटील व आभार सोनल तिवारी यांनी मानले. सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
विचारमंथन करणे गरजेचे
जीवनात आपल्याला काय करायचे आहे किंवा काय बनायचे आहे. कोणत्या क्षेत्रात आपल्याला नेतृत्व करायचे आहे याची माहिती विद्यार्थी दशेत नसते. परंतु ज्याप्रमाणे आपण प्राथमिक माध्यमिक व उच्च शिक्षण घेत असतो त्या पद्धतीने आपला विकास होत असतो. त्यावेळी देखील आपण आपले धेय निश्चित करू शकत नाही. किंवा धेय निश्चित केलेच तर अनेक वेळा त्यात बदल करतो. अशावेळी तुम्ही निश्चित केलेल्या धेयासाठी स्वयंस्पूर्ती, आत्मविश्वास, ज्ञानाचे सादरीकरण आणि तुमचा व्यक्तिगत विकास या बाबी यशस्वितेसाठी महत्वाच्या ठरतात. केलेल्या विचारांवर मंथन करणे गरजेचे आहे. स्वत:शी प्रामाणिक राहुन कामात पारदर्शकता दिसायला हवी. तुम्ही निश्चित केलेल्या धेयाशी निगडीत तुमचे शिक्षण गरजेचे आहे. महत्वाचे म्हणजे वेळेचे नियोजन आणि अर्थपूर्णता फार मौल्यवान आहे असेही अल्ताफ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले.