यशासाठी कठोर मेहनत व सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज -माजी आमदार शिरीष चौधरी

0

निंभोरा येथे जनसंग्राम संघटनेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

निंभोरा- विद्यार्थी दशेपासूनच आपले ध्येय निश्चित करून त्यात यश मिळविण्यासाठी कठोर परीश्रम व सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक असल्याचे विचार माजी आमदार शिरीष चौधरी यांनी येथे व्यक्त केले. जनसंग्राम बहुजन लोकमंचच्या वतीने दहावीच्या शालांत परीक्षेत निंभोरा बोर्डातून यशवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव सौ.डी.आर.चौधरी माध्यमिक विद्यालयात करण्यात आला. याप्रसंगी माजी आमदार चौधरी बोलत होते. रावेरचे पंचायत समिती दीपक पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
जनसंग्रामचे संस्थापक विवेक ठाकरे हे स्वागताध्यक्ष म्हणून तर निंभोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे, संस्थेचे अध्यक्ष ईश्वरशेठ चौधरी, सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष रोहिदास ढाके, माजी सरपंच अमान खान, ग्रा.पं.सदस्य रमेश येवले, मुजाहिद गुलाब शेख, मधुकर बिर्‍हाडे, डॉ.महेंद्र भालेराव, मनोज दामुसेठ दुसाने, नरेंद्र नामदेव ढाके, सुधाकर भंगाळे, ए.एच.वारके, मुख्याध्यापिका सायराबी खान प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

या यशवंतांचा झाला गौरव
निंभोरा बोर्डातून प्रथम आलेल्या- अल्ताब युसूफ पटेल (निंभोरा) व रक्षा अजय पाटील (दसनुर), द्वितीय-रितेश गोपाळ तायडे (पुरी-गोलवाडा) यांच्यासह चेतन अरुण बोरनारे, रसिका वैभव पाटील, रोहित विनय फुकटे, अक्षदा ज्ञानेश्वर चौधरी, कृष्णल राजेंद्र चौधरी, साक्षी विनोद पाटील, लीना मिलिंद चौधरी, पूनम विश्वनाथ कोळी, ज्ञानेश्वर महेंद्र टोंगे, शिवानी प्रकाश मेघे , देवश्री संदीप भंगाळे यांनी प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवत यश संपादन केल्याबद्दल सर्वांना जनसंग्राम संघटनेच्या वतीने स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

वीर जवानाचा सहृदयी सत्कार
कार्यक्रमात निंभोरा येथील सैनिक श्रावण महाले हे भारतीय सैन्यात 23 वर्ष सेवा केल्यानंतर सेवानिवृत्त झाल्याने या वीर जवानाचा त्यांचे वडील भादु महाले व आई जाऊबाई महाले यांच्यासह गौरवपत्र देऊन जनसंग्रामच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे यांच्याहस्ते सहृदय सन्मान करण्यात आला. यशवंत विद्यार्थ्यांपैकी अल्ताब पटेल, चेतन बारनारे व देवश्री भंगाळे यांनी मनोगत व्यक्त करून आपली अभ्यासाची पद्धत व ध्येय बोलून दाखवले. प्रास्ताविक वाय.डी.पाटील यांनी केले. सूत्रसंचालन दिलशाद शेख व प्रा.दिलीप सोनवणे यांनी तर आभार नितीन दोडके यांनी मानले.

यशस्वीतेसाठी यांनी घेतले परीश्रम
यश्वस्वीतेसाठी नदीम शेख, दस्तगीर खाटीक, गौरव ठाकरे, किरण सपकाळे, यशवंत गाजरे, मिलिंद तायडे, उत्तम बारी, ज्ञानेश्वर उमक, अल्तमश खान, रोहिदास तायडे, इम्रान पटेल, फिरोज खाटीक, संदीप मोरे, आकाश बोरसे, धीरज चौधरी, ललित पाटील, अतुल येवले, नवाज पिंजारी, ईश्वर पाटील, किरण कोंडे, धनराज बारी, चेतन महाले, हर्षल चौधरी, शुभम बारनारे, हर्षल भारंबे, राज खाटीक, प्रकाश निंभोरे, हरीष चिमणकारे व विद्यालयाच्या शिक्षक- शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परीश्रम घेतले.