यशोधित स्कुलचे स्नेहसंमेलन

0

बारामती । म्हसोबावाडी येथील यशोधित इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच पार पडले. व्यसनमुक्ती व देशभक्तीचा संदेश देणारे कार्यक्रम विद्यार्थ्यांनी यावेळी सादर केले. जिल्हापरिषदेने आयोजित केलेल्या नाट्यस्पर्धेतील विजेत्या कलाकारांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या संस्थेचे अध्यक्ष छगनराव नांदगुडे यांना शिवगर्जना समाजभूषण तर प्राचार्य संतोष जगताप यांना आदर्श प्राचार्य पुरस्कार देऊन यावेळी गौरविण्यात आले.

संस्थेचे समन्वयक प्रकाश खोत यांना रोटरी क्लबतर्फे नाट्यभूषण पुरस्कार देण्यात आला. याप्रसंगी रोटरी क्लब बारामतीचे अध्यक्ष अब्बास नाशिकवाला, भिगवण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निलकंठ राठोड, प्रताप पागळे, मनोहर सांगळे, वृषाली माकर, रविंद्र टीळेकर आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.