यस बँकेच्या कार्यकारी संचालकाने केली पीआर कन्सल्टन्सीची स्थापना

0

मुंबई । येस बँकेचे मार्केटिंग आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशनचे माजी कार्यकारी संचालक अनिल मॅथ्यूज यांनी ब्रँड अँड पीआर कन्सल्टिंग फर्म, मॅथ्यूसन ब्रँड आणि पीआर सल्लागारांची स्थापना केली आहे. मॅथ्यूज पीआर उद्योगात 17 वर्षांपेक्षा जास्त काळ काम करत आहे. देशातील काही आघाडीच्या पीआर कंपन्यांसोबत त्यांनी काम केले आहे. 17 वर्षांपेक्षा आधिक काळ पीआर कंपन्यांसोबत काम केल्यानंतर त्यांनी स्वत:ची ब्रँड अँड पीआर कन्सल्टिंग फर्मची स्थापनेचा निर्णय घेतला. फर्मच्या माध्यमातून नवीन एजन्सींना ब्रॅण्ड स्ट्रॅटेजी व प्लॅनिंग, बाजारपेठांतील माहितीबाबत मार्गदर्शन करणार आहे.

ग्राहकांना करणार मार्गदर्शन
याबाबत मॅथ्यूसन ब्रँड आणि पीआर कन्सल्टंट्सचे संस्थापक आणि संचालक अनिल मॅथ्यूज म्हणाले, सध्याच्या घडीला अस्थिर बाजारपेठेमध्ये ब्रँडची प्रतिष्ठा आणि स्थान टिकवणे कठीण आहे. आमच्या ग्राहकांना स्पर्धात्मक राहण्यासाठी आणि अनुकूल व्यवसाय वातावरण निर्माण करण्याची आमची जबाबदारी आहे. त्यासाठी कंपनीच्या माध्यमातून यावर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे.