यांचे मानधन किती?

0

मुंबई । क्रिकेटपटूचे मानधन वाढावे यासाठी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांनी बीसीसीआयच्या अधिकार्‍यांनी भेट घेतली. बीसीसीआयकडूनही या खेळाडूंना सकारात्मक प्रतिक्रिया देण्यात आली आहे. 30 सप्टेंबर 2017 रोजी भारतीय क्रिकेट क्रिकेटपटूंचा बीसीसीआयसोबतचा करार संपला आहे. त्यामुळे नव्याने करार करण्याआधी बीसीसीआय आणि खेळाडूंमध्ये चर्चा सुरु आहे. काहीच दिवसांपूर्वी आयपीएलचे प्रसारणहक्क स्टारने विकत घेतले. या लिलावामध्ये बीसीसीआयला मोठ्या प्रमाणावर फायदा झाला आहे. हा फायदा खेळाडूंनाही मिळावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. बीसीसीआयशी झालेल्या करारानुसार अ श्रेणीमधल्या खेळाडूंना वर्षाला दोन कोटी रुपये मिळतात. ब श्रेणीत असलेल्या खेळाडूंना वार्षिक एक कोटी आणि क श्रेणीमध्ये असलेल्या खेळाडूंना 50 लाख रुपये मिळतात. याशिवाय कसोटीमध्ये पहिल्या 11 खेळाडूंना प्रत्येक सामन्याचे 15 लाख रुपये, एका एकदिवसीय क्रिकेट सामन्यासाठी सहा लाख रुपये आणि एका टी-20 सामन्यात खेळण्यासाठी तीन लाख रुपये मिळतात. याशिवाय क्रिकेटपटू निरनिराळ्या जाहिरातींच्या माध्यमातूनही कोट्यवधी रुपयांची स्वकमाई करत असतात.

हा आहे क्रिकेटपटूंच्या मानधनाचा आकडा
अ श्रेणी – सात क्रिकेटपटू (2 कोटी रुपये मानधन)
विराट कोहली, धोनी, आर. अश्‍विन, अजिंक्य रहाणे, चेतेश्‍वर पुजारा, रवींद्र जडेजा, मुरली विजय.

ब श्रेणी- नऊ क्रिकेटपटू (1 कोटी रुपये मानधन)
रोहित शर्मा, के.एल.राहुल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा, उमेश यादव, वृद्धीमान सहा, जसप्रीत बुमराह, युवराज सिंग.

क श्रेणीमध्ये1 5 क्रिकेटपटू ( 50 लाख रुपये मानधन)
शिखर धवन, अंबाती रायडू, अमित मिश्रा, मनीष पांडे, अक्सर पटेल, करुण नायर, हार्दिक पांड्या, केदार जाधव, चहल, पार्थिव पटेल, जयंत यादव, मनदीप सिंग, धवल कुलकर्णी, शार्दुल ठाकूर, रिषभ पंत