यावमधील घरफोडीचा उलगडा ; तिघा आरोपींना अटक

0

न्यायालयाने सुनावली चार दिवसांची पोलिस कोठडी ; गुन्ह्यांचा होणार उलगडा

यावल- शहरातील कुंभार टेकडी परीसरात 14 नोव्हेंबर रोजी झालेल्या घरफोडीत 21 हजारांचा ऐवज चोरी गेला होता तर या प्रकरणी तीन संशयीतांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपींच्या अटकेमुळे शहरातील अन्य गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे. कुंभारटेकडी यावल येथे भगवान वसंत कुंभार यांच्या घरी 14 नोव्हेंबर 18 सकाळी सात ते दुपारी चारच्या दरम्यान घर बंद असल्याने चोरट्याने घराचा कडी कोंडा तोडून तीन ग्रॅम सोन्याची पोत व दहा हजार रुपये रोख असे एकूण 21 हजार 145 रुपये किंमतीचा ऐवज लांबवल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक दत्तात्रय परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली गोरख तात्या पाटील तपास करीत असताना गुप्त बातमीदारांच्या माहितीवरून अल्ताफ खान रशीद खान (रजा नगर, सुरत, गुजरात), मोमीन नदीम शेख ताहेर (डांगपुरा, यावल), तौसिफ खान मेहमूद खान (आयशा नगर नवी वसाहत, यावल) या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. दरम्यान, यावल शहरात गेल्या एक ते दीड वर्षापासून आठ ते दहा ठिकाणी घरफोड्या झाल्या असून या गुन्ह्यात आरोपींची सहभाग असल्याची शक्यता असून चार दिवसांच्या पोलिस कोठडीत त्याबाबत उलगडा होणार आहे.