यावलचा लाचखोर कृषी सहाय्यक जाळ्यात

0
एक हजार 500 रुपयांची लाच घेताना अटक
भुसावळ:- प्रस्तावातील त्रृटींची पूर्तता करण्यासाठी एक हजार 500 रुपयांची लाच मागणार्‍या यावल तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील सहाय्यक कृषी सहाय्यक रामसिंग भोमसिंग पवार यास जळगाव एसीबीने सोमवारी दुपारी रंगेहाथ अटक केली. जळगावच्या जनाई ईरीगेशनमधील अभियंत्यांनी या संदर्भात तक्रार दिली होती.
शेतकर्‍यांकडील ठिबक सिंचन अनुदानाचे प्रस्ताव तयार करून ते पुढील कारवाईसाठी पाठवण्यासाठी आरोपीने लाच मागितली होती. लाच घेताना आरोपी रामसिंग पवार (श्रद्धा कॉलनी, जळगाव) यास सोमवारी अटक करण्यात आली. ही कारवाई जळगाव एसीबीचे उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली..