यावलचे तत्कालीन निरीक्षक बळीराम हिरे यांना अटकपूर्व जामीन मंजूर

0

लाच प्रकरण ; 50 हजारांच्या जात मुचलक्यावर मिळाला जामीन

भुसावळ : यावल पोलीस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक बळीराम हिरे यांना भुसावळच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्या.डोरले यांनी 50 हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. एका तक्रारदाराला धमकावत गुन्हा दाखल करण्याचा इशारा हिरे यांच्यासह दोघा कर्मचार्‍यांनी दिल्यानंतर एक लाख 20 हजार रुपये बँक खात्यातून काढले होते तर या प्रकरणी दोघा कर्मचार्‍यांना एसीबीने अटक केली होती तर हिरे मात्र सापडत नव्हते. सोमवारी त्यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी होवून अर्ज मंजूर करण्यात आला. हिरे यांच्यातर्फे अ‍ॅड.अश्‍विनी डोलारे व अ‍ॅड.जयश्री देशमुख यांनी युक्तीवाद केला.