जिल्हाधिकार्यांचा आदेश ; अर्जदार गिरीश महाजनांचा अर्ज निकाली
यावल- यावल पालिकेच्या नगरसेविका कल्पना दिलीप वाणी यांनी मुदतीत जात प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांना अपात्र करण्यासंदर्भात गिरीश प्रकाश महाजन यांनी जिल्हाधिकार्यांकडे याचिका सादर केली होती. वाणी यांनी 29 मे 2018 रोजी यावल मुख्याधिकार्यांकडे जात प्रमाणपत्र सादर केल्याने त्यांचा अर्ज निकाली काढण्यात येत असल्याचे जिल्हाधिकार्यांनी 12 रोजी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.