यावलच्या वृद्धाने केले उंदीर मारण्याचे औषध प्राशन ; उपचारादरम्यान मृत्यू

0

यावल- शहरातील 63 वर्षीय वृद्धाने उंदीर मारण्याचे औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने त्यास जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 16 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता त्यांचा मृत्यू झाल्याने जिल्हा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करून ती यावल पोलिसात वर्ग करण्यात आली. गंगाराम सावळा शिंदे (63, रा.शिवाजी नगर, यावल) असे मृत ईसमाचे नाव आहे. याबाबत सीएमओ डॉ.दिनेश खेताडे यांनी खबर दिली. तपास उपनिरीक्षक सुनीता कोळपकर करीत आहेत. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.