‘बांधकाम जैसे थे’ ठेवण्याचे आदेश ; पुढील निर्णयाकडे लागले लक्ष
यावल- नगरपालिका संचलित साने गुरुजी विद्यालयात सुरू असलेले निकृष्ट बांधकाम बंद करण्यासाठी यावल येथील जागृक नागरीक नरेंद्र शिंदे व इतर लोकांनी जिल्हाधिकारी, जळगाव व मुख्याधिकारी नगरपालिका यावल यांना वेळोवेळी अर्ज दिले होते परंतु त्यांनी संबंधित ठेकेदारावर कोणतीही कारवाई केली नाही म्हणून नरेंद्र शिंदे यांनी यावल येथील न्यायालयात दिवाणी दावा दाखल केला. याप्रकरणी यावल न्यायालयात 19 /2018 चा दावा दाखल करण्यात आला आहे. यावल मुख्याधिकार्यांनी संबंधित ठेकेदार यांना बांधकाम बंद करावे यासाठी मागणी केली असता यावल येथील न्यायाधीश जगताप यांनी सदरची कामे स्टेटस को (जशी परिस्थिती आहे तशीच राहू देणे) चा आदेश केला आहे. या खटल्यात नरेंद्र शिंदे यांच्याकडून अॅडव्होकेट गोविंदा बारी यावल यांनी काम पाहिले..