यावलजवळ ट्रक चालकावर हल्ला करीत लूट : संशयीत ताब्यात

0

यावल- चोपडा रस्त्यावरील भारत डेअरीजवळील हतनूर वसाहतीच्या समोर हरभर्‍याची वाहतूक करणार्‍या ट्रक (एम.एच.18 बी.ए 2424) वर चार ते पाच संशयीतांनी दगडफेक करीत चालकाला 48 हजार रुपयात लुटल्याची घटना मंगळवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली. दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी ट्रकवर सुरूवातीला जोरदार दगडफेक करीत ट्रक अडवला व चालकास लूटले. या घटनेनंतर पोलिसांनी तपासचक्रे फिरवून काही संशयीतांना ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.