यावल- शहरातील खिर्नीपुरा बुरुज चौक परीसरातील रहिवासी व पाप्युलर झेरॉक्सचे संचालक शेख ईरफान शेख वहाब यांची पाच वर्षीय चिमुकली बुशरा फातेमा शेख हिने रमजानचा पवित्र रोजा (उपवास)ठेवला होता. तिने दाखवलेल्या धाडसाचे कुटुंबासह समाजातील नागरीकांनी कौतुक करून तिला आशीर्वाद दिला.