यावलमधून चोरट्यांनी कार लांबवली

यावल : चोर्‍या-घरफोड्यांची घटना घडत असताना चोरट्यांनी आता मोर्चा महागड्या कारकडे वळवला आहे. शहरातील श्रीकृष्ण नगरातून एकाची तीन लाख 20 हजार रुपये किंमतीची तवेरा कार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

यावल पोलिसात गुन्हा दाखल
प्रकाश भास्कर पारधे (42, श्रीराम नगर, यावल) हे खाजगी कॉन्ट्रॅक्टर असून शुक्रवार, 15 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता त्यांनी यावल येथील श्रीकृष्ण नगरातील प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना कार्यालयासमोर त्यांची मालकीची तवेरा (एम.एच.04 ई.एफ.2658) पार्क केली होती. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी तीन लाख 20 हजार रुपये किंमतीची तवेरा लांबवली. ही बाब शनिवार, 16 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता उघडकीला आला.

पोलिसांकडून फुटेजच्या आधारावर शोध
महाजन यांनी परीसरात कारचा शोध घेतला परंतू कार कोठेही आढळून आली नाही. सायंकाळी पाच वाजता यावल पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास प्रभारी अधिकारी आतीश कांबळे यांच्या आदेशावरून सहाय्यक फौजदार नितीन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहे.