यावलमधून 28 हजार रुपये किंमतीचे तार लंपास

28 thousand wires were extended from the Royal Cement Factory of Yawal यावल : शहरातील चोपडा रस्त्यावरील अक्सानगरातील रॉयल सिमेंट प्रॉडक्ट कारखान्यामधील 28 हजार रुपये किंमतीचे तार अज्ञात चोरट्याने लांबवले. हा प्रकार उघडकीस आल्यावर यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्यांचा पोलिसांकडून शोध
शहरातील चोपडा रस्त्यावरील अक्सा नगरात रॉयल सिमेंट प्रॉडक्स नावाने कारखाना आहे. या कारखान्यात कामाकरीता आणलेले 28 हजार रुपये किंमतीचे लोखंडी तारांचे 70 किलो वजनाचे तारांचे बंडल चोरट्यांनी लांबवले. या प्रकरणी मकसूद खान जफरउल्ला खान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बालक बार्‍हे करीत आहे.