यावलमध्ये अज्ञातांनी फर्निचर दुकान पेटवले

0

पाच लाखांचे नुकसान ; अज्ञात आरोपींचा शोध सुरू

यावल:- शहरातील चोपडा रस्त्यावरील ख्वाजा मस्जिदजवळील एका फर्निचरच्या दुकानास सोमवारी पहाटे अचानक आग लागल्याने ाच लाखांचे साहित्य जळून खाक झाले. दुकानाला कुणीतरी अज्ञात व्यक्तिंनी आग लावल्याचा संशय आहे. चोपडा रस्त्याच्या कडेला मुन्सी फर्निचर हे शेख असलम शेख अजगर यांच्या मालकीचे मुन्सी फर्निचर नामक दुकान आहे. दुकानात सागवान लाकडापासून विविध प्रकारचे फर्निचर तयार केले जात होते. रविवारी रात्री कामे आटोपून दुकान बंद करून शेख असलम घर गेल्यानंतर सोमवारी पहाटे त्यांच्या दुकानास आग लागलीचे निर्दशनास आले. परीसरातील नागरिकांसह पालिकेच्या अग्नीशमन बंबास पाचारण करण्यात आले मात्र तोवर सर्व साहित्य व लाकूड जळून खाक झाले.

साहित्याचा झाला कोळसा
आगाीमुळे दुकानात लाकूड कापण्याचे इलेक्ट्रॉनिक दोन कटर मशीन, दोन रंधा मशीन, दोन खरोपा मशीन तसेच तीन ग्राईंडर मशीन जळाल्याने एक लाखांचे नुकसान झाले तर दुकानातील इतर साहित्यांसह चार लाखांचे सागवान लाकूड या आगीत जळून खाक झाले.दुकानात इलेक्ट्रीक कनेक्शन असले तरी शॉट सर्किट होणे शक्य नाही. कुणीतरी अज्ञात व्यक्तीने दुकानास आग लावल्याचा संशय शेख असलम यांनी व्यक्त केला आहे. आगीसंदर्भात महसूल व पोलीस प्रशासनास माहिती देण्यात आली आहे तर पंचनामा करण्याकरीता महसूल विभागातील कर्मचारी दाखल झाले.