यावल : शहरात रविवारी सायंकाळी रमजान ईदच्या पूर्वसंध्येला आरसीपी पथक क्रमांक दोन तसेच यावल पोलिस ठाण्याचतील पोलिस कर्मचार्यांनी शहरातील विविध भागातून पथसंचलन केले. रमजान ईद निमित्त कुणीही नमाज पठण करण्यासाठी प्रार्थनास्थळ, ईदगाह मैदानात जाणार नाहीत, अशा सूचना यापूर्वीच देण्यात आल्या असून आपल्या कुटुंबासमवेत घरीच नमाज पठण करावे, अशा सूचना मुस्लिम बांधवांना करण्यात आल्या आहेत.