यावल- शहरातील मुख्य रस्त्यावर किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारी होवून तिघे झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी दोन्ही गटांनी दिलेल्या परस्परविरुद्ध फिर्यादीनुसार 10 जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल झाला. पहिल्या गटातर्फे संभाजी मधुकर बारी यांनी फिर्याद दिली. त्यात ते मेनरोडवर अशोका रेडिमेड स्टोअरजवळ मुलास शेजारील दुकानातील कापड बोटाने दाखवत असताना महेश अशोक देवांग यांनी आपल्याकडे काय बोट दाखवतो? अशी विचारणा करत हुज्जत घातली. त्याच्यासोबतच्या सागर अशोक देवांग, आतिश देवांग व गुलाब देवांग या चौघांनी फिर्यादी व त्यांचे भाऊ रामा बारी यांना मारहाण केली. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा झाला. दुसरी फिर्याद गुलाब देवांग यांनी दिली. त्यात रामा बारी, संभाजी बारी, राहुल बारी, पुंडलिक बारी, सचिन बारी व पुंडलिक बारी यांचा मुलगा यांच्याविरुद्ध दंगलीसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल झाला.