यावलमध्ये गरजू नागरीकांची हिंदू-मुस्लीम एकता मंचने भागवली भूक

0

यावल : हिंदु मुस्लीम एकता मंचतर्फे गोर गरीबांना सलग सातव्या दिवशी जेवण देण्यात आले. प्रांताधिकारी अजित थोरबोले व यावल तहसीलदार जितेंद्र कुंवर, शेखर सोपान पाटील यांची उपस्थिती होती. यावल शहरांतील या गोर गरीब वस्तीत दररोज संध्याकाळी जेवण वाटप करण्यात येत आहे. श्रीराम नगर,पंचशील नगर,माग वाडा, आझाद नगर,गोळीबार, बाबा नगर,सईद पुरा, कुंभार खंड, ईसलामपुरा, बाबुजी पुरा, प्रताप नगर,खिरनिपुरा, सुंदर नगरी, शिवाजी नगर,भिलवाडी, डांगपुरा अकसा नगर अदीवाड्यात हिंदु मुस्लीम एकता मंच तर्फे जेवण वाटप करण्यात येत आहे. याप्रसंगी कदीर खान,राजेश करांडे,नेहाल सर, चेतन पाटील, दिवाकर फेगडे, अजहर शेख, अस्लम सर,ईकबाल खान,अकिल अहमद,कलीमोधीन शेख,चेतन करंडे,जुबेर सर,नासीर पटेल, हाफिज खान,ईरफान शेख,शोएब अहमद, उस्मान खान, परंजल सोनवणे, खुशाल करांडे,अ.नबी, हर्षल पाटील, अक्रम पटेल आदी उपस्थित होते.