यावलमध्ये डिबार झाल्याच्या नैराश्यातून विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न

0

तातडीच्या उपचारानंतर प्रकृती स्थिर ; जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार

यावल- आदिवासी मुलींच्या वसतिगृहातील बी.ए.तृतीय वर्षाच्या विद्यार्थिनीने परीक्षेत कॉपी केल्यानंतर डीबार झाल्याच्या नैराश्यातून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली होती. विद्यार्थिनीवर तातडीचे उपचार करण्यात आल्याने तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. या विद्यार्थिनीवर आता जळगावच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हेमा गणपत पावरा (22, रा.धडगाव, जि. नंदूरबार) आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थिनी यावलच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मंगळवारी बी.ए.च्या तृतीय वर्षाचे पेपर देत असताना मंगळवारी हिंदीच्या पेपरला कॉपी करताना आढळल्याने तिच्यावर डीबारची कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर विद्यार्थिनीने आलेल्या नैराश्यातून तिने वसतीगृहात आल्यानंतर उपचारार्थ आणलेल्या विविध प्रकारच्या तब्बल आठ गोळ्या घेवून आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर या विद्यार्थिनीवर डॉ.प्रवीण पाटील यांच्याकडे उपचारार्थ दाखल करण्यात आले तसेच त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात डॉ.उमेश कवडीवाले, सरला परदेशी यांनी प्रथमोचार करून तिला ात्काळ जळगाव जिल्हा शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ हलवण्यात आले. तिची प्रकृती आता स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, या प्रकाराची माहिती मिळताच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एफ.एन.महाजन, डॉ.प्रा.प्रल्हाद पावरा, प्रा.अर्जुन पाटील रुग्णालयात दाखल झाले तर आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी आर.बी.हिवाळे यांनी या प्रकाराची माहिती घेत कार्यालयातील प्रतिनिधींना रूग्णालयात पाठवले तर जळगावला या विद्यार्थिनीसोबत वसतीगृह अधीक्षक विशाखा बोरकर यांना पाठवण्यात आले.