हल्लेखोराने तीन हजारांची रोकडही लांबवली
यावल – शहरातील खाटीक वाड्यात एका डॉक्टरावर त्यांच्या दवाखान्यात जावुन एकाने चाकुने हल्ला केल्याने शहरात एकच खळबळ उडाली. शुक्रवारी सायंकाळी पाऊने आठ वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेत दोन जण जखमी झाले तर हल्लेखोराने रूग्णांलयातुन तीन हजाराची रोकड लांबली.
हल्ला रोखण्याच्या प्रयत्नात दोघे जखमी
शहरातील खाटीक वाड्यात अल फैज क्लिनीक हे डॉ. रिजवान अहमद फैज अहमद पठाण यांचा दवाखाना आहे. शुक्रवारी सांयकाळी ते दवाखान्यात असतांंना संशयीत आरिफ रशीद खाटीक हा तेथे आला व डॉक्टरांना चाकुचा धाक दाखवुन जीवे ठार मारण्याची धमकी देत पाच हजारांची मागणी केली मात्र डॉक्टरांनी त्यास पैसे देण्यास नकार दिला तेव्हा त्यांने थेट डॉक्टरावर चाकूने हल्ला केला. तो हल्ला डॉ. रिजवान यांनी उजव्या हातावर घेतला. तेव्हा तीन वेळा त्याने हातावर चाकु मारल्याने डॉक्टर रक्त बंबाळ होत घाबरले. तेव्हा खाटीक याने त्यांच्या दवाखान्याच्या गल्ल्यात असलेली तीन हजाराची रोकड लांबवली. तसेच त्यास रोखण्याचा प्रयत्न करणारा कंम्पाऊंडर शेख खालीद शेख आमिर यास देखील खाटीक याने तोंडावर बुक्का मारून तेथुन पसार झाला.
संशयीताला अटक
डॉ.रिजवान यांनी पोलिस ठाणे गाठले. तेथून ग्रामीण रूग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. घडलेल्या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक डी. के. परदेशी, हवालदार संजय तायडे, विकास सोनवणे, सुनिल तायडे पथकासह दाखल झाले व शहरातून तत्काळ संशयीताला ताब्यात घेण्यात आले. घटनास्थळाची पाहणी करून संशयीत खाटीक विरूध्द जबरी चोरी, हल्ला करुन जखमी करणे तसे महाराष्ट्र वैद्यकिय सेवा व्यक्ती व वैद्यकिय सेवा संस्था मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियम 2019 चे कलम 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश तांदळे, हवालदार संजय तायडे करीत आहे.