यावलमधील दाम्पत्याने विहिरीत उडी घेवून केली आत्महत्या

0

शेतातील विहिरीत उडी घेवून संपवले जीवन : आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात

यावल : शहरातील महाजन गल्ली परीसरास्थित दाम्पत्याने कुठल्यातरी कारणावरून शेतातील विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आल्याने शहरात खळबळ उडाली. भागवत उर्फ बाळू डिगंबर पाटील (61) व त्यांच्या पत्नी विमलबाई भागवत पाटील (57, दोन्ही रा.महाजन गल्ली परीसर, यावल) अशी मयतांची नावे आहे.

आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याची चर्चा
यावल-फैजपूर रोडला लागून असणार्‍या निर्मल चोपडे यांच्या शेतातील विहिरीबाहेर दोघांच्या चपला आढळल्यानंतर शोध घेतला असता दाम्पत्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. विशेष म्हणजे शहरातील नागरीकांना या दाम्पत्याने पहाटे फिरण्यासाठी जात असल्याचेदेखील सांगितले असल्याचे बोलले जात आहे. दाम्पत्याने आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याचीदेखील चर्चा होती. मयत भागवत पाटील हे कृउबा सदस्य पुंजा पाटील यांचे लहान बंधू आहेत. त्यांच्या पश्‍चात दोन विवाहित मुली आहेत.