यावल- शहरातील बोरावल गेट या परीसरात ज्ञानेश्वर गजानन सपकाळे (46) हा अवैधरीत्या देशी दारूच्या बाटल्यांसह आढळल्याने त्यास अटक करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून बॉबी संत्रा देशी दारूच्या 22 बाटल्या तसेच टँगोपंचच्या 26 बाटल्या जप्त करण्यात आल्या. कॉन्स्टेबल भूषण रवींद्र चव्हाण यांच्या फिर्यादीनुसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन चव्हाण करीत आहेत.