यावलमध्ये महसुलच्या संपामुळे कामकाज प्रभावीत

यावल : विविध मागण्यांसाठी महसूल कर्मचारी सोमवारपासून संपावर गेल्यानंतर यावल तहसील कार्यालयात प्रभावीत झाले आहे. विविध कामांसाठी आलेल्या नागरीकांना संपामुळे आल्या पावली माघारी परतावे लागले. सोमवारी सकाळी येथील तहसील कार्यालयातील कर्मचार्‍यांनी एकत्र येत कार्यालयासमोर शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार महेश पवार यांना देण्यात आले.

या मागण्यांसाठी कर्मचारी संपावर
महसुल सहाय्यकांची रीक्त पदे भरणे, अव्वल कारकून, मंडळ अधिकारी संवर्गातुन नायब तहसीलदार संवर्गात पदोन्नती देण्यासह विविध मागण्यांसाठी कर्मचारी संपावर उतरले आहेत. यापूर्वी टप्प्या-टप्प्याने आंदोलन करून राज्य शासनाकडून मागण्या मान्य न झाल्याने सोमवारपासून बेमुदत संप सुरू करण्यात आला. या संपात महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे आर.बी. माळी, नायब तहसीलदार भारती भुसावरे, राहुल सोनवणे, मुक्तार तडवी, सुयोग पाटील, सकावत तडवी, दीपक बाविस्कर, मंडळाधिकारी शेखर तडवी, प्रदीप मुंद्रे, लियाकत तडवी, रवींद्र मिस्तरी, भाग्यश्री इंगळे, पी.पी.कांबळे, सुरज जाधव, वाय.डी.पाटील, बाळु पाटील, इनूस खान, सलीम शेख, रामा कोळी, संजय कोळी, रहेमान तडवी आदी कर्मचारी सहभागी झाले.