यावल : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त यावल शहरातील पंचशील नगर आणि श्रीराम नगर या भागातील 70 वंचित कुटुंबातील सदस्यांना जीवनोपयोगी साहित्य आणि किराणा साहित्याचे नुकतेच डॉ.कुंदन फेगडे यांच्यातर्फे वाटप करण्यात आले.
खर्या गरजूंना मिळाली मदत
पाच किलो गहू, दोन किलो तांदूळ, एक किलो डाळ, एक किलो खाद्यतेल, दोन किलो साखर, चहा पावडर, मिरची पावडर (संपूर्ण मिळून एक किट ) आदी वस्तू गरजूंना देण्यात आल्या. ज्यांना स्वतःचे पक्के घर नाही, घरात कुणालाही सद्य परिस्थितीत रोजगार मिळत नाही, ज्यांच्या घरात प्रदीर्घ आजाराने पीडित व्यक्ती आहेत व ज्यांचे हातावर पोट आहे अशा गरजूंपर्यंत मदत पोहोचवण्यात आली. यासाठी विष्णू पारधे व मंगला पारधे या दाम्त्याचे सहकार्य मिळाले. भूषण फेगडे, रीतेश बारी, संजय फेगडे, धीरज फेगडे, मनोज बारी, उज्वल कानडे, दीपक फेगडे यांचे सहकार्य लाभले.