यावल : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने संपुर्ण राज्यात 14 ते 30 एप्रिल पर्यंत संचारबंदी लागु केली आहे. या काळात संचारबंदीचे नियम मोडुन बेशिस्त फिरणार्यांवर कारवाई सुरू आहे. यावल शहरात शुक्रवारी पोलिसांनी अशाच पद्धत्तीने कारवाई करीत 59 जणांची अॅन्टीजन टेस्ट केल्यानतर त्यात एक बाधीत आढळल्याने खळबळ उडाली. बाधीताला तातडीने उपचारार्थ हलवण्यात आले.
यांनी केली कारवाई
यावलचे कर्तव्यदक्ष पोलस निरीक्षक सुधीर पाटील, पोलिस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले यांच्यासह पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे कर्मचारी तसेच नगर परीरषदेचे अधिकारी व कर्मचारी यांनी ही कारवाई केली. शुक्रवारी 16 एप्रिल रोजी पोलिसांनी शहरातील विविध वर्दळीच्या परीसरात कुठलेही कारण नसता फिरणार्या 59 नागरीकांची अचानक अॅन्टीजन टेस्ट केल्यानंतर विनाकारण फिरणार्यांच्या गोटात खळबळ उडाली. अॅन्टीजन तपासणी यावल ग्रामीण रुग्णालयाचे तंत्रज्ञ नानासाहेब घोडके व त्यांच्या आरोग्य कर्मचारी यांच्या पथकाने केली. दरम्यान, मास्क न लावणार्या व सोशल डिस्टंसिंगचे पालन न करण्यासह संचारबंदीचे नियम मोडणार्या 22 जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली.