तहसीलदारांना निवेदन ; हा तर साखर उत्पादकांचे कंबरडे मोडण्याचा डाव
यावल- भारतातील साखर कारखान्यांनी उत्पादीत केलेली साखर मोठ्या प्रमाणात उपलब्ध असताना शासानाने पाकिस्तानकडून साखर अयात केल्यामुळे मनसेतर्फे साखर वाटप करुन सरकारचा निषेध करण्यात आला तर यावल तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
स्वदेशी साखर वापरण्याचे आवाहन
भारतातील साखर कारखान्यांनी उत्पादीत केलेली साखर मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून पाकिस्तानातून साखर आयात केली जात आहे त्यामुळे साखर शेतकर्यांचा व साखर उत्पादकांचे कंबरडे मोडण्याचा डाव आहे. शेतकरी कर्जबाजारी झाला असून त्याच्या मालाला भाव मिळालेला नाही. शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केलेली असून शेतकर्यांना अडचणीत आणण्याचे काम शासनाने सुरू केले आहे. त्याचा निषेध म्हणून यावल तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे भारतीयांनी स्वदेशी साखर वापरावी, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फ करण्यात आले. सर्व व्यापार्यांनी पाकिस्तानातील साखर आयात करु नये व विकू नये, असे आवाहन तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे मनसेतर्फे करण्यात आले.
यांच्या निवेदनावर स्वाक्षर्या
निवेदनावर यावल शहराध्यक्ष चेतन अढळकर, तालुका सचिव संजय नन्नवरे, यावल शहर उपाध्यक्ष ईस्माईल खान, शहर सचिव बशीर शेख, शाखा अध्यक्ष आबीद कच्छी, जगदिश लावणे, अविनाश तळेले , असलम खान, मतीन शेख, हर्षल बाविस्कर, इरफान खान आदींच्या स्वाक्षर्या आहेत.