यावलमध्ये हाणामारी, सहा जण गंभीर

0

भंगार साहित्य घराबाहेर ठेवल्याने उफाळला वाद

यावल :- शहरातील खाटीक वाड्यात भंगार साहित्य घरासमोर का ठेवले? या कारणावरून दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत एकाच कुटुंबातील सहा जण गंभीर जखमी झाले तर यातील तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंगळवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली.