यावलला उद्यापासून अखंड नामजप यज्ञ सप्ताह

0

यावल- शहरातील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ बालसंस्कार केंद्र, यावल दिंडोरी प्रणित गुरुपीठ शाखेत दत्त जयंतीनिमित्त अखंड नामजप यज्ञ सप्ताहाला शनिवारपासून सुरुवात होत आहे. हा सप्ताह 15 ते 23 डिसेंबर पर्यंत चालणार आहे. यामध्ये रोज सकाळपासून ग्रामदेवता निमंत्रण ध्वजारोहण सप्तः पूर्वतयारी, मंडल मांडणी, देवता स्थापना, अग्निस्थापना स्थापित देवता हवन, श्री गणेश याग, श्री मनबोध याग, श्री चंडी याग, श्री गीताई याग, श्री स्वामी याग, श्री रुद्र याग, श्री मल्हारी याग, श्री दत्तजयंती बली पूर्णाहुती तसेच 22 रोजी दुपारी श्री दत्त जयंती जन्मोत्सव साजरा होणार आहे. 23 डिसेंबर रोजी श्री सत्यदत्त पूजन व महाआरती होईल. वीणावादन अखंड श्री स्वामी समर्थ मंत्र जाप व अखंड श्री स्वामी चरीत्र सारामृत पारायण होणार आहे. ज्या भाविक भक्तांना सात दिवस गुरुचरित्र पारायणास बसावयाचे असेल त्यांनी आपली नावे श्री स्वामी समर्थ केंद्र, यावल सेवेकरी यांच्याकडे द्यावीत, असे श्री स्वामी समर्थ केंद्रातर्फे कळवण्यात आले आहे.