यावल- पालिकेच्या एका प्रभागासाठी 27 ररोजी पोटनिवडणूक होणार आहे. प्रभाग क्रमांक 1 अ चे नगरसेवक शेख बशीर शेख मोहमद मोमीन यांचे गेल्या महिन्यात निधन झाल्याने त्यांच्या रीक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर होत आहे. त्या प्रक्रियेंतर्गत पालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप यादीवर नागरीकांकडून हरकती मागवल्या आल्यानंतर पाच हरकती प्राप्त झाल्या. त्यातील एक हरकत फेटाळण्यात आली तर चार हरकती स्वीकारण्यात आल्या आहेत. 29 डिसेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतर 31 डिसेंबर रोजी मतदान केंद्रनिहाय मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे. 27 जानेवारी 2019 रोजी येथील मतदान होणार असून तत्पूर्वी 2 ते 9 जानेवारी 2019 या कालावधीत नामनिर्देनपत्र स्वीकारली जाणार आहेत. नामनिर्देनपत्रांची 10 जानेवारी 2019 रोजी छाननी होईल तर मतदान 27 जानेवारी 2019 रोजी सकाळी 7.30 ते ते सायंकाळी 5.30 या वेळेत व मतमोजणी 28 जानेवारी 2019 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे.