ऑल महाराष्ट्र मुस्लीम खाटीक समाजातर्फे राज्यात प्रथमच विवाह मेळाव्याचे आयोजन ; अल्प पैशातील विवाह स्तुत्य उपक्रम
यावल- ऑल महाराष्ट्र मुस्लिम खाटीक समाजाच्या येथील तालुका शाखेच्या वतीने मंगळवारी शहरातील फैजपूर रस्त्यावरील प्रमोद गडे यांच्या शेतात राज्यातील पहिलाच सामूहिक विवाह सोहळा झाला. त्यात 29 जोडपी विवाहबध्द झाले. अत्यंत शिद्धबद्धपणे आयोजकांनी मेळाव्याचे नियोजन केल्याने सर्वत्र त्याचे कौतुक करण्यात आले तर लोकप्रतिनिधींनी दाम्पत्यांना शुभार्शिवादही दिले. नाममात्र रक्कम घेवून विवाह लावण्यात आले तर उर्वरीत खर्च आयोजकांनी केला. मौलाना शमीमबाबा यांच्या अधिपत्याखाली सहा मौलवींनी निकाह पढला.
यांची होती उपस्थिती
माजी आमदार शिरीष चौधरी, रमेश चौधरी, भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी, जिल्हा परीषदेचे काँग्रेसचे गटनेते प्रभाकर सोनवणे, हाजी शब्बीरखान मोहम्दखान, शे. ताहेर शे.चांद उपस्थित होते. ऑल महाराष्ट्र मुस्लीम खाटीक समाजाच्या येथील तालुका खाटीक समाज शाखेच्या वतीने तालुक्यात प्रथमच मुस्लीम खाटीक समाजाचा सामूहिक विवाह सोहळा झाला. आयोजन केले आहे. समारांभात 29 जोडप्यांचा निकाह पार पडला. समारंभासाठी मुंबई, मालेगाव, धुळे, नाशिक, शहरासह मध्यप्रदेश , गुजरात राज्यातून समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यांनी घेतले परीश्रम
मेळाव्यासाठी यावल तालुका आयोजन समितीचे अध्यक्ष शे.बराती शे. अजीज, शे.अकबर शे.गुलाम, हाजी हकीम हाजी अल्लाउद्दी, हाजी सईद हाजी अहमद, असलम शे. सुपडू, हाजी अय्युब शे.सुव्हान, हाजी ताहेर मो. बशीर, जैनुद्दीन मो.शिरीन, शे.जमील शे.रहेमतुल्ला, शे.वाहेद, अ. वाहब, शे.शकील शे.सुब्हान, शे.शफी शे. मुसा, शे.शकील शेख मोहम्मद, शे. युनूस शे.लाल, शे.रमजान शे.इसा, गु.हसन गु. हुसेन, शे.अख्तर शे. गुलाब, शे. मुश्ताक शे.इन्साक, शे.हारुन शे.मासुम, शे.मुश्ताक शे. मुक्तार, शे. असलम शे.महेमूद आदी समाजबांधवांनी परीश्रम घेतले.