यावल- रात्रीच्या वेळी मालकीची पाळीव जिवंत गाय लबाडीच्या इराद्याने 1 नोव्हेंबर 15 रोजी चोरून येणार्या घटनेतील आरोपी यावल न्यायालयाचे न्यायाधीश डी.जी.जगताप यांनी एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 15 दिवसाची शिक्षा आणि कोर्ट उठे पावेतोची शिक्षा ठोठावली. यावल येथे गोळीबार टेकडी भागात शोभा राम रामचंद्र बारेला यांची 1 नोव्हेंबर 15 रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास घरासमोरील गाय यावल येथील बाबूजी पुरा येथील रहिवासी आरोपी जुबेर खान हबीब खान याने चोरून नेली होती. याबाबत शोभाराम बारेला याने यावल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिल्यावरून भाग 5 गु र नंबर 85 15 नुसार गुन्हा दाखल होता. याबाबत यावल पोलिसांनी यावल न्यायालयात हा खटला दाखल केल्यानंतर सरकार पक्षातर्फे अॅड.नितीन खरे यांनी सरकारची बाजू मांडली. त्यात तपासी अंमलदार शांतीलाल बोरसे, पैरवी अधिकारी हेड कॉन्स्टेबल प्रमोद लोंढे, केसवॉच शेख अलीम यांनी कामकाज हाताळले..