यावलला गो मातेचे डोहाळे जेवण 

0
अनोख्या उपक्रमाची चर्चा ; महिलांना दिले भोजन
यावल :- शहरातील व्यास नगरात थेट गायीचे डोहाळे पुजन करून महिलांना भोजन देण्यात आले. गोमाता पूजनाचा हा उपक्रम मालती येवले यांच्या संकल्पनेतुन राबवण्यात आला तर त्यास संपूर्ण परीसरातील महिलांनी साथ दिली. यावेळी गायीला ज्या प्रमाणे गरोदर महिलेला सजवून डोहाळे पुरवले जातात त्या प्रमाणे महिलांनी कार्यक्रम घेतला. या वेळी मालती येवलेंसह दीपाली येवले, सुनीता गायकवाड, माधुरी मोरे, रेखा बारी, दीपाली बारी, लीना खेडकर, जयश्री बारी, सरला माळी, अर्चना येवले सह आदी महिलांची उपस्थिती होती.