यावलला दत्त जयंतीनिमित्त अखंड नामजप यज्ञ सप्ताहाला सुरुवात

0

यावल- शहरातील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ बालसंस्कार केंद्र, यावल दिंडोरी प्रणित गुरुपीठ शाखेत दत्त जयंतीनिमित्त अखंड नामजप यज्ञ सप्ताहाला शनिवारपासून सुरुवात झाली. सप्ताह 23 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. 16 रोजी सकाळी सकाळी आठ वाजता भूपाळी आरतीनंतर ध्वजारोहण करून महिलांच्या अखंड सात दिवस चालणार्‍या या सप्ताहाची सुरुवात श्री स्वामी समर्थ ग्रंथाचे वाचन श्री स्वामी समर्थ जपमाळ व विना वजनाच्या झंकाराणे तसेच यादी व मंत्राच्या जपाने व गुरुचरीत्र पारायण वाचनाने या सोहळ्याची सुरुवात झाली. या ईश्वरीय मंगल सोहळ्यास मोठ्या उत्साहात स्वामी समर्थ सेवेकर्‍यांनी भाग घेतला. यामध्ये रोज चालणार्‍या सकाळपासून ग्रामदेवता निमंत्रण ध्वजारोहण सप्तः पूर्वतयारी मंडल मांडणी देवता, स्थापना अग्निस्थापना स्थापीत देवता, हवन श्री गणेश याग, श्री मनबोध याग, श्री चंडी याग, श्री गीताई याग, श्री स्वामी याग, श्री रुद्र याग, श्री मल्हारी याग, श्री दत्तजयंती बली पूर्ण या सर्व पूजा होत आहेत 22 रोजी दुपारी श्री दत्त जयंती जन्मोत्सव साजरा होणार आहे. 23 डिसेंबर रोजी श्री सत्यदत्त पूजन व महाआरती सप्ताह सांगता सकाळी साडेदहा वाजता महानैवेद्य आरतीने सप्ताहाची सांगता होणार आहे. सप्ताहा दरम्यान सात दिवस अखंड सेवा म्हणून अखंड वीणा वादन अखंड श्री स्वामी समर्थ मंत्र जाप व अखंड श्री स्वामी चरीत्र सारामृत पारायण होत आहे.