यावलला पाण्याची नळी लावण्यावरून हल्ला : तिघांना अटक

यावल : शहरातील बोरावल गेट भागात पाण्याच्या नळी लावण्यावरून सहा जणांवर हल्ला करण्यात आला होता. यातील संशयीत सात आरोपींपैकी तिघांना यावल पोलिसांनी अटक केली आहे. संशयीतांना न्यायालयात हजर केले असता 25 एप्रिलपर्यंत चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली तर चार संशयीतांचा पोलिस शोध घेत आहे. जखमींपैकी एका वृध्दाची प्रकृती चिंताजनक आहे.

नळ लावण्यावरून झाला वाद
गुरूवारी सायंकाळी शहरातील बोरावल गेट भागातील कमाबाई राजू पटेल यांची नात आयेशा पटेल व मुलगी फरीदा पटेल हे शेजारील दत्तू धनगर यांच्या घरातून नळाचे पाणी घेण्यासाठी नळी लावत असतांना मीना समशेर तडवी व तिची मुलगी फातिमा समशेर तडवी या दोघींनी त्यांना शिवीगाळ करून नळी हिसकावून घेतली होती व नंतर मीना समशेर तडवी, फातिमा समशेर तडवी, आरिफ राजू तडवी, सरफराज समशेर तडवी, शहारुख सिकंदर तडवी, गोलू कलींदर तडवी व कलिंदर रमजान तडवी हे सात जण हातात कुर्‍हाड व लाठ्या-काठ्या घेऊन आले आणी राजू लतीफ पटेल (65) सह जब्बार राजू पटेल, अरबाज राजू पटेल नसीम आरीफ पटेल, फरीदा पटेल व आयेशा पटेल या सात जणांवर हल्ला करण्यात आला होता. रात्री उशीरा यावल पोलिसांनी या गुन्ह्यात कलंदर तडवी, फातेमा तडवी व मिना तडवी या तिघांना अटक केली. शुक्रवारी त्यांना येथील न्यायालयात प्रथमवर्ग न्या.एम.एस.बनचरे यांच्या समोर हजर केले असता तिघांना सोमवार, 25 एप्रिल पर्यंत चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुदाम काकडे करीत आहे.

वृध्दांची प्रकृती गंभी
या हल्ल्यात 65 वर्षीय वृध्द राजु पटेल यांची प्रकृती अधिकच गंभीर झाली असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत तर या गुन्ह्यातील चार संशयीतांच्या शोधाकरीता पोलिसांचे दोन पथक रवाना करण्यात आले आहे.