यावलला भावना दुखावणारी पोस्ट ; एकाविरुद्ध गुन्हा

0

यावल- मुस्लिम धर्माच्या धर्मगुरूविषयी एका सोशल मीडिया ग्रुप वर भावना दुखविणारी प्रतिक्रिया व्यक्त करून मुस्लिम धर्माच्या भावना दुखावल्याच्या कारणावरून येथील पोलीस ठाण्यात बर्‍हाणपूर येथील संशयीत आरोपी ईनाम उल्लाखान अमानुल्लाखान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. बाबूजी पुरा भागातील मोहम्मद आरिफ रजा ईस्माईल यांनी यावल पोलिसात या प्रकरणी फिर्याद दिली. या घटनेने शहरातील मुस्लिम बांधवामध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. पोलीस उपअधीक्षक राजेंद्र रायसिंग यांनी येथील पोलीस ठाण्यात भेट माहिती जाणली. यावलचे पोलीस निरीक्षक डी.के.परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सुनीता कोळपकर पुढील तपास करीत आहेत.