निमंत्रण पत्रिकेवरील फोटोवरून यावल शहर काँग्रेसमध्ये असंतोष
यावल : नगरपालिकेच्या वतीने शनिवार, 16 रोजी आयोजित विविध विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेरील फोटोवरून नगरसेवकांच्या एका गटासह शहर काँग्रेसमध्ये तीव्र असंतोष आहे. तत्कालीन महसूल मंत्री आमदार एकनाथ खडसेंनी मिळवून दिलेल्या निधीतील विकास कामांचे भुमिपुजन करण्यास शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील हे येत आहेत.
पालिकेत सत्ताधारी शिवसेनेकडून वर्षभरात एक काम झाले नसताना व दमडीचा निधी मिळवता आला नसताना आता दुसर्यांच्या कामांचे श्रेय लाटत स्वत:हा नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप विरोधी गटाने केला आहे.