यावलला 8 जानेवारी रोजी खाटीक समाजाचा सामूहिक विवाह सोहळा

0

30 जोडपी विवाह बंधनात अडकणार ; आयोजकांकडून जागेची पाहणी

यावल- ऑल महाराष्ट्र मुस्लिम खाटीक समाजातर्फे 8 जानेवारी रोजी फैजपूर रोडवरील पेट्रोल पंपासमोरील प्रशस्त 9 हेक्टर जमिनीवर सामूहिक विवाह सोहळा होणार असून या सोहळ्यात 30 जोडपी विवाहबंधनात अडकणार आहेत. विवाह सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर आयोजकांनी जागेची पाहणी करीत उपाययोजनांबाबत चर्चा केली.

सहा मौलवींच्या उपस्थितीत होणार निकाह
देशातून पहिल्यांदाच हा उपक्रम खाटीक समाजातर्फे आयोजित करण्यात आला आहे. फैजपूर रोडवरील पेट्रोल पंपासमोर 150 बाय 180 फूटाचा मंडप उभारण्यात येत आहे. वधू-वरांसाठी स्वतंत्र 15 बाय 15 चा मंडप असून सकाळी 10.30 वाजेेला ‘निकाह’ला सहा मौलवी सुरुवात करतील. विवाहस्थळी नमाज अदा करण्यासाठी एक स्वतंत्र मशीद उभारण्यात येईल. तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सात टँकरद्वारे करण्यात येईल. वर्‍हाडींसाठी फैजपूर रस्त्यावरील पेट्रोल पंपासमोरील पटांगणात वाहनतळ तयार करण्यात येईल. सामूहिक विवाह सोहळ्यासाठी प्रमोद गडे आणिी गडे परिवाराने 10 हेक्टर क्षेत्र उपलब्ध करून दिले आहे. गुरुवारी आयोजकांंसह नगरसेवक अतुल पाटील, शेख असलम, धीरज महाजन, शेख बाराती, हाजी हकीम हाजी अल्लाद्दीन, शेख अकबर, हाजी सईद, असलम शेख सुपडू, हाजी अय्यूब शेख, जैनुद्दीन मो. शिरीन, हाजी ताहेर मो. बशीर, शेख जमील आदींनी तयारीची पाहणी केली.

अत्यल्प नोंदणी शुल्क
वधू-वरांकडून या सामूहिक विवाह सोहळ्यात नोंदणीसाठी प्रत्येकी 5 हजार 100 रूपये घेतले असुन प्रत्येकाच्या 100 वर्‍हाडींची येथे व्यवस्था असेल. या सर्व व्यवस्थेसाठी 500 स्वयंसेवक आणि समन्वयासाठी 11 जणांची व्यवस्थापकीय टीम लक्ष ठेवून असेल.

सोहळ्यासाठी कमेटीची स्थापना
शेख बराती शेख अजीज हे अध्यक्ष आहेत. शेख अकबर शेख गुलाब हे उपाध्यक्ष शेख असलम शेख सुपडू, जैनुद्दीन मोईनुद्दीन, शेख वाहेद अब्दुल वहाब, हाजी सईद हाजी अहमद, हाजी हकीम हाजी अलाउद्दीन, हाजी अयुब शेख सुभान, हाजी, ताहेर मो.बसीर सेक, जमील शेख रहमतुल्ला, शेख शकील शेख सुभान शेख, शकील शेख मोहम्मद, शेख रमजान शेख इसा, शेख अख्तर शेख गुलाब, शेख हारून शेख मासूम, शेख असलम शेख महंमद, शेख शफी शेख मुसा, शेख युनूस शेख लाल, गुलाम हसन गुलाम हुसेन, शेख मुश्ताक शेख इसाक, शेख मुश्ताक शेख मुख्तार यांचा कमिटीमध्ये समावेश आहे.